पुणे : पुण्यातील (Pune News) रखडत असणारे कात्रज चौकातील (Katraj Chowk) उड्डाणपुलाचे काम वाहतूक शाखेकडून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. यापूर्वीही कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम हाती घेतले होते. मात्र पुणेकरांच्या होणाऱ्या कोंडीमुळे सातत्याने पुढे ढकलले जात होते. मात्र आता आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Telangana Encounter : तेलंगणातील मुलुगुमध्ये चकमक! सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा
कोणते मार्ग बंद?
- कात्रज चौकात जड/अवजड वाहनांना बंदी असणार आहे. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलापासून आणि नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपुल येथे आणि मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.
- सोलापुरकडून हडपसरमंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशिन चौकापुढे, मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
- सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडून कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. त्याचबरोबर, मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४ वाजेपर्यंत प्रवेश चालू ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील. (Pune News)