
पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय; 'असे' आहे नियोजन
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन (Railway Administration) नेहमीच कार्यरत असते. लोकल प्रवाशांचा प्रवास आरामदायी व कोंडीमुक्त होण्यासाठी विशेष लोकल किंवा जादा लोकल फेऱ्या चालवल्या जातात. अशातच सुपरफास्ट सेवेसाठी रेल्वेने एसी लोकल (AC Train) सेवा सुरु केली. या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) मार्गावर जादा एसी लोकल चालवण्याचा (Extra AC Local) निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा आता गारेगार होणार आहे.

सुदैवाने जीवितहानी टळली मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात वीरा देसाई रोडवर रहिवाशी इमारतीत भीषण आग लागली आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास या ...
पश्चिम रेल्वेने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यानुसार, आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर १३ नव्या एसी लोकल धावणार आहेत. सध्या मुंबई उपनगरीय भागावर एसी लोकल सेवांची संख्या ९६ आहे ती वाढून १०९ होणार आहे. प्रवाशांची एसी लोकलसाठीचे लोकप्रियतता आणि वाढती मागणी पाहता पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
कसे असेल वेळापत्रक?
- पश्चिम रेल्वेवरील १३ नव्या एसी ट्रेनमधील ६ सेवा अप आणि ७ सेवा डाऊन मार्गावर धावणार आहेत.
- वरच्या दिशेने धावणाऱ्या विरार-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट दरम्यान २-२ रेल्वे धावतील.
- विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरी दरम्यान प्रत्येकी एक एसी ट्रेन धावेल.
- डाऊन मार्गावर चर्चगेट-विरार दरम्यान दोन सेवा तर चर्चगेट-भाईंदर, अंदेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदर दरम्यान प्रत्येक एक एसी ट्रेन धावणार आहे.