IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पार पडला. एकपेक्षा एक वरचढ पैशांची बोली लावत अनेक टीम्सने आपल्याकडे चांगले खेळाडू सामावून घेतले. त्यापैकी काही खेळाडूंवर बोली लावली गेली नाही तर काही खेळाडूंवर जास्त किंमतीची बोली लावण्यात आली. आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत सॅम कुरन, रविचंद्रन अश्विन, रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यासह अनेक जुन्या खेळाडूंना परत घेतले आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला पुन्हा संघात घेताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला. दीपक चहरला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.
आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, सर्व १० संघांनी मिळून ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक संघाकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले. असे असतानाही दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात आली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजांवरही मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला.