CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

  107

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केले भाष्य, म्हणाले...


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result 2024) लागला असून यामध्ये महायुती (Mahayuti Government) सरकारचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढलेली 'माझी लाडकी बहीण योजना' (Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असल्याचे महायुतीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता पुढी हप्त्याकडे लागले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.



निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले की, 'महिलांना आता १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांनी मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


दरम्यान, “एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे”, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल