सोलापूर: सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबरपासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.
https://prahaar.in/2024/11/24/decision-to-exclude-the-villages-of-uruli-devachi-and-fursungi-from-the-municipality/
मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक –
सोलापूर – मुंबई सकाळी ०९:४० वाजता विमान उडणार. स. १०:४० मुंबईत पोचणार
मुंबई – सोलापूर दुपारी १२:४५ वाजता विमान उडणार. दुपारी १:४५ सोलापुरात येणार.
गोवासाठी उड्डाण वेळापत्रक
सोलापूर – गोवा
दुपारी ०२:१५ वाजता
दु. ०३:१५ गोवा पोचणार
गोवा – सोलापूर
सकाळी ०८:१० वाजता
स. ०९:१० सोलापुरात पोचणार.