Assembly Election Result : जिंकणार कोण? सर्वांनीच बुडवले पाण्यात देव!

  96

महायुती-मविआ अलर्ट! गुप्त बैठका वाढल्या, हॉटेलही बूक झाले, पुढे काय?


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले असून निकाल लागण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर मतमोजणीही सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commision) व महापालिकेने (Municipality) चोख नियोजन केले आहे. तसेच निकालाआधीच अनेक विभागाकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही विभागाने महायुती (Mahayuti) तर काही संस्थांनी मविआचं (Maha Vikas Aghadi) सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत.



एक्झिट पोलनुसार दाखवल्या जाणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ऐनवेळी कसलीही बंडखोरी होऊ नये याची पुरेपुर काळजी दोन्ही आघाडीतील नेते मंडळींकडून केली जात आहे. निकालादरम्यान, दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.



काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था


वाढत्या मतदारांनी टक्केवारी पाहता काँग्रेसकडून (Congress) विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जर काठावरचं बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.


त्याचबरोबर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.


दरम्यान, भाजपाने (BJP) सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने (UBT Group) ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निकालाचे वातावरणात काय रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या