पुणे : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी (Alandi Yatra) येत्या रविवारपासून शुक्रवारपर्यंत पीएमपीच्या (PMP Bus) ३४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान मंगळवार (ता. २६), बुधवार (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) रात्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आळंदी यात्रेसाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या स्थानकांवरून जादा बस सुटणार आहेत. याच स्थानकांवरून भाविकांच्या गर्दीनुसार रात्र बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही विशेष बससेवा रात्री १० नंतर सुरू होईल. त्यासाठी नियमित तिकीट दरापेक्षा ५ रुपये अधिक तिकीट दर आकारणी होईल. तसेच एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकांस यात्रा कालावधीत रात्री १० नंतरच्या जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. (Alandi Yatra)