Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडीEncounter : छत्तीसगड चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Encounter : छत्तीसगड चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा येथे आज, शुक्रवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्‍या चकमकीत (Encounter) १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलाने त्यांच्याकडून एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात शस्‍त्रास्‍त्रे जप्त केली आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार छत्तीसगडच्या भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असताना अचानक चकमक सुरू झाली. यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

चकमकीनंतर शोध मोहिम राबवण्यात आली. यात आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. या परिसरात छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणी किस्टाराम एरिया कमेटीचे नक्सली सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुकमा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भेज्जी क्षेत्राअंतर्गत्‍कोराजुगुड़ा, दंतेसपुरम, नागाराम, भंडारपदरच्या जंगल क्षेत्रात चकमक झडली. याबाबत बस्तचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले की, दक्षिण सुकमामध्ये डीआरजीसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच घटनास्थळाहून इन्सास रायफल, एके-४७, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली असून परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू आहे.

कॉपी बहाद्दरांनो सावधान! दहावी-बारावीच्या परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग

दरम्यान या चकमकीनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केले आहे. यासंदर्भात सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरील संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, सैनिकांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. आमचे सरकार झिरो टॉलरन्सच्या धोरणावर काम करत नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार लढा देत आहे. बस्तरमध्ये विकास, शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे विष्णुदेव साई यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -