मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchhan) त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे दोघेही सध्या खूपच चर्चेत आहे. मात्र, यावर दोघांनीही मौन ठेवले आहे. अशातच नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो तर १६ नोव्हेंबरला तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस असतो. तर २१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस असतो. नुकतेच ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ऐश्वर्याने वडिलांच्या जयंतीनिमित्त मुलगी आणि बाबा दोघांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. मात्र या सर्व फोटोमध्ये अभिषेक बच्चन कुठेच दिसून येत नाही आहे. यावरून ऐश्वर्याच्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.
यामध्ये ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलीचे कोणीच न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोमध्ये आराध्याच्या लहानपणापासून ते आतापर्यंतची झलक पाहायला मिळते आहे. एका फोटोमध्ये आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोफ्रेमवर डोकं ठेवल्याचं पहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्यासुद्धा तिच्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून उभी दिसतेय. तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या दोघीसुद्धा कृष्णराज राय यांच्या फोटोसमोर उभ्या असल्याचं पहायला मिळतंय. अभिनेत्रीने फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे बाबा आणि मुलगी आराध्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही कायम माझ्या हृदयात आहात”, असं कॅप्शन लिहित तिनं यावर हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे. चाहत्यांनी ऐश्वर्याच्या या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या वैवाहिक जीवनाची जोरदार चर्चा होत आहे. त्यात ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट केले. यामध्ये अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही, त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होणार अशी चर्चा पुन्हा एकदा गाजली आहे. तसेच अभिषेक बच्चन ‘दसवी’ या चित्रपटातील सहकलाकार निम्रत कौरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या तुफान चर्चा सुरू आहेत. असं असले तरी अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनीही अद्याप या चर्चांवर आपलं मत व्यक्त केलेलं नाही.