Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीKantara 2 Teaser : रक्ताने माखलेले अंग, लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष, हाती...

Kantara 2 Teaser : रक्ताने माखलेले अंग, लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष, हाती त्रिशूल; ‘कांतारा २’ चा टीझर प्रदर्शित!

‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : दोन वर्षापूर्वी ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांनी दिग्दर्शित केलेला ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर निर्माण केले आहे. बॅाक्स ऑफिसवर कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बहुचर्चित सिनेमा ‘कातांरा २’चा (Kantara 2) टीझर रिलीज (Teaser Release) करण्यात आला असून रिलीज डेट देखील घोषित केली आहे.

गोड कलाकारांसह ‘जिलबी’१७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

‘कांतारा २’ चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ साली सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना वर्षभर वाट पाहायला लागणार आहे. तसेच हा सिनेमा, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे.

‘कांतारा २’ चा दमदार टीझर

एका कंदब राजवंश काळातील देखाव्यासारखा ‘कांतारा २’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सुरुवातीला ‘तो क्षण आला आहे, दिव्य जंगल कुजबुजते आहे’ असा आवाज ऐकू येत आहे. बॅकग्राऊंडमध्ये, रक्ताने माखलेले अंग , लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष आणि हातात त्रिशूल आणि मशाल घेऊन ऋषभ रहस्यमय अवतारात दिसत आहे. तेव्हा त्याला एक आवाज ऐकू येत आहे. प्रकाश! प्रकाशात सर्व काही दिसते. परंतु हा प्रकाश नाही, ती एक दृष्टी आहे, ही दृष्टी आपल्याया सांगते की, काल काय होत, काय आहे आणि भविष्यात काय होणार! हे दाखवणारी दृष्टी! तू बघू शकत नाही का ? (Kantara 2 Teaser)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -