मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर, आता एक्झिट पोल्स (Exit Poll) येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले आणि आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या दरम्यान हे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 )
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.
तर महायुतीला १४५ ते १५५ जागा मिळतील असा अंदाज न्यूज एक्सच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात, एसएएसच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 127-135 जागा, मविआ 147-155 जागा आणि इतरांना 10-13 जागा मिळताना दिसत आहेत. तर टाइम्स नाऊ जेव्हीसीच्या एक्झिट पोलने महायुतीला 150-167 जागा, मविआला 107-125 जागा मिळतील आणि इतरांना 13-14 जागा मिळतील असे म्हंटले आहे. इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 150 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 118 तर इतरांना 20 जागा मिळतील असे म्हटले आहे. लोकशाही मराठी रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 128 ते 142 जागा, मविआला 125 ते 140 जागा आणि इतरांना 18 ते 23 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 122 ते 186 जागा, महायुतीला 69 ते 112 जागा आणि इतरांना 07 ते 12 जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 77 ते 108 जागा, शिवसेनेला 27 ते 50 आणि राष्ट्रवादीला 18-28 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 28-47 जागा , शिवसेनेला(उबाठा) 16-35 जागा राष्ट्रवादी (तुतारी गट) 25-39 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 175 ते 195 जागा, एमव्हीएला 85 ते 112 जागा आणि इतरांना 07 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये महायुतीला 152 ते 160 तर मविआला 130 ते 138 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना 6 ते 8 जागा मिळत आहेत. एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150-170 जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये भाजपला 89 ते 101, शिवसेनेला 37 ते 45 आणि राष्ट्रवादीला 17-26 जागा मिळताना दिसत आहेत. तर मविआला 110 ते 130 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये काँग्रेसला 39-47, शिवसेनेला 21-29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 35-43 जागा मिळत आहेत. यासोबतच पी-मार्क्यूने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 137-157 जागा, काँग्रेसला 126-146 आणि इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रीसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 110 किंवा 130 जागा मिळू शकतात असे म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. यासाठी सर्व्हे मध्ये थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.
दरम्यान, हरियाणा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निकालाआधी झालेल्या एक्झिट पोल्समध्ये हरियाणात काँग्रेसचे सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तिथे भाजपाने बाजी मारली.