Saturday, June 13, 2026

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी हे दोन दिवस पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

झिजत असलेल्या विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी अखेर २३ते २४ जून दरम्यान पुरातत्व विभागाकडून विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार असून २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. २२ जून ते २४ जून दरम्यान रासायनिक पद्धतीनेच हे लेपन होणार असून पुरातत्व विभाग नियमानुसार विठ्ठल मूर्तीवर लेपन करणार आहे. त्यामुळे २३ व २४ जून रोजी विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठल मूर्तीच्या पायाला एक खड्डा पडला असून इतर ठिकाणीही मूर्तीवर मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे समोर आल्यानंतर आता याच पद्धतीच्या दगडाची पावडर ऑरगॅनिक रसायनात मिसळून मूर्तीच्या झिजलेल्या भागावर लावली जाणार आहे.

लेपन प्रक्रियेमुळे २३ आणि २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्र तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे यासाठी २३ आणि २४ जून या दोन दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >