Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीNuclear weapons : पुतीन यांनी सैन्याला दिली अण्वस्त्र वापरास परवानगी

Nuclear weapons : पुतीन यांनी सैन्याला दिली अण्वस्त्र वापरास परवानगी

मॉस्को : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने (Nuclear weapons) केलेल्या विध्वंसानंतरही जगभरातील देशांनी अण्वस्त्र बनवणे थांबवलेले नाही. भारतासह जगातील बहुसंख्य विकसनशील आणि विकसित देशांनी स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रांची निर्मिती सुरुच ठेवली आहे. मात्र अद्याप त्याच्या वापरास कोणी धजावलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांनी अण्वस्त्र वापराच्या निर्णयाला परवानगी देत जागतिक युद्धजन्य स्थितीला अधीक टोकदार केले आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनला रशियामध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर पुतिन यांनी हा निर्णय घेतला.

मााहितीनुसार, जर एखाद्या देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला तर अशा परिस्थितीत मॉस्को अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. युक्रेन युद्धाला १००० दिवस पूर्ण झाल्यामुळे पुतिन यांनी अण्वस्त्रांशी संबंधित नवीन आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) वापरण्याची परवानगी दिली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली ३०० किमीपर्यंत अचूक हल्ले करू शकते.

Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग

काही काळापासून अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा विचार करत होते. यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा अर्थ नाटो रशियाविरुद्धच्या युद्धात उतरला आहे, असा इशारा दिला होता. असे झाले तर नक्कीच उत्तर देऊ, असे ते म्हणाले होते.

अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यास बरेच काही बदलेल, असे पुतीन (Vladimir Putin) यांनी एका सरकारी टीव्ही चॅनलवर सांगितले होते. या शस्त्रांचा वापर उपग्रहाशिवाय शक्य नाही. युक्रेनमध्ये असे तंत्रज्ञान नाही. हे केवळ युरोपियन युनियन उपग्रह किंवा अमेरिकन उपग्रहाच्या मदतीने केले जाऊ शकते. या क्षेपणास्त्र प्रणालींचा वापर करण्याचे प्रशिक्षण केवळ नाटोच्या लष्करी जवानांनाच मिळाले आहे, असेही पुतीन म्हणाले होते. युक्रेनचे सैनिक ही क्षेपणास्त्रे (Nuclear weapons) चालवू शकत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -