नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये हवा प्रदूषणाने गंभीरतेची पातळी ओलांडली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी दिल्लीतील न्यायालयांच्या सुनावण्या ऑनलाईन (online) घेण्याची विनंती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली. त्यांनी ऑनलाईन सर्व सुनावण्या घेण्यास नकार दिला.
प्रदूषणाची पातळी पाहता त्यांनी वकिलांना दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायधीश संजीव खन्ना यांनी वकिलांना सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणीची शक्यता आहे, त्यामध्ये घेतली जाईल. दिल्लीतील गंभीर प्रदूषणामुळे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील व सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांकडे सर्व प्रकरणांच्या सुनावण्या ऑनलाईन घेण्याची विनंती केली होती.
शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, दररोज १० हजार वकील त्यांच्या वाहनांतून प्रवास करतात. ऑनलाईन (online) सुनावण्यांमुळे यामध्ये बराच फरक पडू शकतो.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…