Friday, February 14, 2025
Homeक्रीडाChampions Trophy: या दिवशी होणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची होणार घोषणा!

Champions Trophy: या दिवशी होणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची होणार घोषणा!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy), एक ऐतिहासिक स्पर्धा आहे जी आतापर्यंत ६ विविध देशांनी जिंकली आहे. अखेरच्या चॅम्पियनन्स ट्रॉफीचे आयोजन २०१७मध्ये झाले होते. मात्र आता असे वाटत आहे की २०२५मध्ये ही स्पर्धा पुन्हा भरवण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा वाटत आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी ३ महिने बाकी आहेत मात्र अद्याप वेळापत्रक तयार झालेले नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता मिडिया रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की याच आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी या आठवड्याच्या शेवटीपर्यंत वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकेत. दुसरीकडे नव्या विधानानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिाऱ्यांशी बातचीक सुरू आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी भारतीय संघ संकटात

हायब्रिड मॉडेल स्वीकार होणार?

भारताने एकीकडे आपल्या संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत हायब्रिड मॉडेलची चर्चा सुरू आहे. मात्र हे हायब्रिड मॉडेल अखेर काय आहे? खरंतर २०२३ आशिया कप दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशात पीसीबीला जबरदस्तीने हायब्रिड मॉडेलचा वापर करावा लागला होता. यानुसार सर्व संघाचे सामने पाकिस्तानात आणि भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -