मुंबई; भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाईल. मात्र त्याआधी भारतीय संघ संकटात सापडला आहे. संघाचे ४ खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
पर्थ कसोटीच्या आधी भारतीय खेळाडू वाका स्टेडियममध्ये जोरदार सराव करत आहे. भारत आणि भारत ए संघादरम्यान बंद दरवाजाच्या आत तीन दिवसांचे सराव सामने खेळवले जात आहेत. या सरावादरम्यान चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.
सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलला दुखापत झाली. गिल दुसऱ्या स्लिपवर कॅच घेत असताना दुखापतग्रस्त झाला. गिलच्या बोटाला दुखापत झाली असून पहिल्या कसोटीत खेळणे निश्चित नाही. गिलबाबत लवकरच अधिकृतपणे निर्णय घेतला जाईल.
IND vs AUS: शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, टीम इंडियात या खेळाडूला मिळू शकते संधी
या सराव सामन्या दरम्यान केएल राहुलही दुखापतग्रस्त झाला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या एका बॉलवर त्याला दुखापत झाला. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. राहुलची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, तो पहिल्या कसोटीसाठी फिट असेल अशी आशा आहे.
सर्फराजच्या कोपराला दुखापत
राहुलच्या आधी सर्फराज खानही दुखापतग्रस्त झाला होता. सर्फराजला सरावादरम्यान कोपराला दुखापत झाली होती. एका व्हिडिओमध्ये तो कोपर पकडत जाताना दिसला.
कोहलीलाही दुखापत
सर्फराजच्या पर्थ कसोटी खेळण्याबाबत संशयाचे ढग दाटले आहेत. दरम्यान, अपेक्षा आहे की राहुलप्रमाणेच सर्फराजही पर्थ कसोटीसाठी फिट ठरेल. दुसरीकडे विराट कोहलीबाबतही अशी बातमी समोर येत आहे की
सराव सामन्याआधी कोहलीलाही स्कॅनसाठी नेण्यात आले होते. दरम्यान, चांगली बाब म्हणजे कोहली पूर्णपणे फिट असून या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत(विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल(विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.