Assembly Election: निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी

नाशिक: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक(Assembly Election) २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मतदानाची गोपनियता राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन तसेच वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध केला आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिल्या आहेत.


मोबाईल किंवा अन्य साधनांचा वापर करून मतदारांवर धाकदपटशा, दडपशाही केली जाऊ नये यासाठीही मतदान केंद्रात मोबाईल वापरास बंदी सक्त मनाई केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी, मतदान यंत्रात बिघाड इत्यादी तातडीच्या कामकाजासाठी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी यांना केवळ मोबाईल वापर अनुज्ञेय आहे.


या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती मतदान केंद्रात मोबाईलचा गैरवापर करतांना आढळल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ व भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे. मतदारांनी वरील सूचनांचे पालन करून मतदान करावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर