मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Tip) घरात जर तुम्हाला आनंदीआनंद हवा असेल तर काही गोष्टी ठेवणे गरजेचे असते. ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही.
या गोष्टी घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. नारळ ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील पुजा घरात नेहमी नारळ ठेवलेला असल्यास आर्थिक समस्या येत नाहीत. यासोबतच घरात सकारात्मकता कायम राहते. घरात राहणाऱ्या लोकांची नेहमी प्रगती राहते.
वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आनंद ठेवण्यासाठी मोरपंख ठेवणेही फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे सगळ्यात उत्तम मानले जाते. अशा घरात कोणतेही संकट येत नाही.
घरात गणपतीची मूर्तिमा ठेवणे शुभ असते. विघ्नहर्ता बाप्पा भक्तांच्या प्रत्येक समस्या दूर करतात.