मुंबई: शुभमन गिलच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, त्याची दुखापत खूप गंभर आहे. गिलचे पर्थ कसोटीतून बाहेर होणे निश्चित आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडिया अभिमन्यू ईश्वरनला संधी देऊ शकते.
खरंतर शुभमन गिल पर्थ कसोटीच्या आधी सराव करत होता. त्याच्यासोबत टीम इंडियाचा दुसरा खेळाडूही उपस्थित होता. गिल शनिवारी एक कॅच घेत असताना दुखापतग्रस्त झाला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि परत आला नाही. शुभमनला स्कॅनिंगसाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. मिडिया रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्याचे पर्थ कसोटीतून बाहेर जाणे निश्चित आहे.
गिलच्या अनुपस्थितीत अभिमन्यूला पदार्पणाची संधी
टीम इंडियासाठी शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करतो. जर तो पर्थ कसोटीसाठी फिट झाला नाही तर अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकेत. तो सध्या ऑस्ट्रेलियातच आहे आणि इंडिया टीम एचा भाग आहे. अभिमन्यूची घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली आहे. मात्र अद्याप त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने १०१ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७६७४ धावा केल्या आहेत.