Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माच्या घरी आली खुशखबर!

मुंबई: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या घरी खुशखबर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दुसऱ्यांदा बाबा बनल्याचा दावा केला जात आहे. त्याची पत्नी रितीका सजदेहने मुलाला जन्म दिला आहे. रोहित आणि रितीकाबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, आतापर्यंत रोहित अथवा रितीका यांच्याकडून याबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.


टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यासाठी विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. मात्र रोहित अद्याप गेलेला नाही. रोहितने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सुट्टीची मागणी केली होती. रोहितची पत्नी रितीका मुलाला जन्म देणार होती. आता मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की रितीकाने मुलाला जन्म दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.


रोहित आणि रितीकाने २०१५मध्ये लग्न केले होते. रितीकाने डिसेंबर २०१८मध्ये मुलीला जन्म दिला होता. मुलीचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितीकाची लव्हस्टोरी अतिशय रंजक होतती.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाईल. जर सगळं काही व्यवस्थित असेल तर रोहित या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकतो.

Comments
Add Comment

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा

Sebastian Sawe : केवळ दोन तासांच्या आत मॅरेथॉनचा विक्रम! सेबॅस्टियन सावेचा ऐतिहासिक पराक्रम

केनियाच्या सेबॅस्टियन सावेने लंडन मॅरेथॉन २०२६ मध्ये इतिहास रचला. त्याने १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात मॅरेथॉन

IPL 2026 : अंगक्रिश रघुवंशीची विकेट वादात, 'क्षेत्ररक्षणात अडथळा' म्हणजे काय?

मुंबई : आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात,

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,