नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे विमान शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे देवघर एअरपोर्टवर बराच वेळ थांबले होते. यामुळे एअर ट्रॅफिकवरही परिणाम झाला. मोदी जमुईतील चाकईमध्ये सभा करून परतत होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाण होऊ शकले नाही. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उडाणांवरही याचा परिणाम झाला.
राहुल गांधी यांचे चॉपरही एक तासांपर्यंत अडकून राहिले
दरम्यान, गोड्डातील महागामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे चॉपरही एक तासांपर्यंत अडकून राहिले. एअर ट्रॅफिक ब्लॉकमुळे त्यांचे चॉपरही जवळपास २ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण करू शकले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले
याशिवाय, झारखंडमधील दुमका येथेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले होते. या सर्व घटनांमगचे कारण म्हणजे, पंतप्रधानांचे विमान देवघर विमानतळावर उभे होते. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आले होते.
पंकजा मुंडेंचे हेलिकॉप्टर भरकटले
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची शुक्रवारी सकाळी नाशिक शहरातील पश्चिम मतदारसंघातील सिडको येथे जाहीर सभा होती. त्यानंतर त्या निफाड तालुक्यात सायखेडा येथे दुपारी सभा घेणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटकडून चुकीचा रूट टाकला गेल्याने मुंडे यांचे हेलिकॉप्टर नाशिकऐवजी थेट सायखेड्याला गेले आणि गोंधळ उडाला. सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याने पदाधिकारी तेथेच त्यांची वाट पाहत होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत त्या सिडकोत आल्याच नाहीत. नाशिकऐवजी त्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे हेलिकॉप्टरने पोहोचल्या. हेलिकॉप्टरच्या पायलटला सायखेडा आणि सिडको अशा दोन्ही ठिकाणांचे अक्षांश, रेखांश देण्यात आले होते. मात्र, त्याने सिडकोऐवजी पहिले सायखेड्याचे अक्षांश, रेखांश टाकल्याने हा गोंधळ झाला.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…