Fake message : सावधान! मतदानाबाबत फिरतोय 'फेक मेसेज'

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. मात्र सध्या १७ नंबर फॉर्म भरून मतदान करण्याबाबत 'फेक मेसेज' (Fake message) सगळीकडे फिरत आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नाही, असे सांगितले.



ज्या मतदारांचे यादीतून नाव डिलीट असा शिक्का लागला असेल तर ते लोक किंवा व्यक्ती मतदान केंद्रावर फॉर्म नं. १७ भरून आणि आपले मतदानकार्ड किंवा आधारकार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. ज्यांची नावे यादीत दिसत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील फॉर्म भरावा आणि मतदानाचा हक्क बजावावा, असा 'मेसेज' सोशल मीडियावर फिरत आहे.


मात्र हा मेसेज फेक (Fake message) असून, अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मतदान केंद्रावर होणार नसल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात