संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी संगमनेर नगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करत प्रशासकीय कारभाराचा पाढा वाचला.


म्हाळुंगी नदी आणि नदी किनाऱ्याचा परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर प्रभागातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्यामुळे नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. या कामांबाबत वारंवार मुख्याधिकाऱ्यांना भेटून आणि निवेदने देऊनही कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अखेर बुधवारी सकाळी नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना कामांबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान नगरसेवक आक्रमक झाले होते. शहरात समस्यांचा डोंगर साचला आहे, मात्र अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कामे सांगूनही जर ती मार्गी लागत नसतील, तर अशा ठिकाणी बसून उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.


या आंदोलनानंतर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांनी नदीवरील पाण्याच्या डबक्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच प्रशासकीय पातळीवर तांत्रिक अडचणींमुळे काही कामे थांबली असून ती लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.


नगरसेवकांचा इशारा


आम्ही आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी यांनी त्वरित त्यावर कारवाई केली, परंतु आज जे काही आंदोलन करण्यात आले, हा तर फक्त ट्रेलर आहे. यापुढे जर पुन्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यास नगरपालिकेने असमर्थता दाखवली तर आणखी तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा नगरसेवक कलंत्री आणि जाजू यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि