Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वFalling Markets : हे ४ शेअर्स तुम्हाला घसरत्या मार्केटमध्ये देतील बक्कल फायदा!

Falling Markets : हे ४ शेअर्स तुम्हाला घसरत्या मार्केटमध्ये देतील बक्कल फायदा!

मुंबई : नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हे व्यवसाय समर्थक मानले जातात. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट्सचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. हे लक्षात घेऊन आणि ट्रम्प यांना केंद्रस्थानी ठेवून काही मार्केट एक्सपर्टनी महत्वाचे ४ स्टॉक्स (Falling Markets) आणले आहेत जे तुम्हाला मजबूत परतावा देऊ शकतात.

हे आहेत कमाईचे ४ स्टॉक!

मार्केट तज्ज्ञांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन यावेळी ४ स्टॉक्सचा आपल्या वॉचलीस्टमध्ये समावेश केला आहे. यात MPHASIS, Latent View Analytics, Rategain Travel, ADF Foods यांचा समावेश आहे. तसेच पुढील १ वर्षाच्या दृष्टीकोनातून या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रो बिजनेस धोरणांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अमेरिकेत एक्सपोजर असलेल्या भारतीय कंपन्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.

जिओ, एअरटेल, हॅथवे सारख्या कंपन्यांचा ‘बाप’ भारतात येतोय!

खरं तर, ट्रम्प येत्या काही दिवसांत (Falling Markets) एकूण कॉर्पोरेट कर कमी करू शकतात. यामुळे अमेरिकन कंपन्यांची खर्च करण्याची शक्ती आणि क्षमता वाढेल. त्याचवेळी, चीनवर आक्रमक शुल्क लादण्याची योजना असू शकते, जी भारतासाठी चांगली परिस्थिती असू शकते.

(Disclaimer : येथे स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही दैनिक प्रहार समूहाची मते नाहीत. प्रहार किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सुचविलेल्या समभागांमध्ये गुंतवणूक केलेली नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -