Ajit Pawar : अजित पवारांच्या बॅगेत सापडले चकली, लाडू; अजितदादा म्हणाले, खा रे बाबांनो...

बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर चांगलीच टीका करताना दिसत आहेत. जसा-जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. राज्याचे प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. अशातच आता राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीत अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांसोबत असणाऱ्या त्यांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. फोनवर बोलत असताना अजित पवारांनी स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबांनो...सगळ्या बॅगा तपासा...त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर...असं अजित पवार (Ajit Pawar) अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.





उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगा तपासल्या


लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली होती. वणी येथेही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यामधील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा...पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला.



देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर ५ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावेळीचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना