"अरे... आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही...!"; बाळासाहेबांचं नाव घेत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' (Balasaheb Thackeray) यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असं म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. आपल्या सरकारने आज महाराष्ट्रामध्ये केलेली कामं जर बघितली, तर दिन, दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, महिला, अल्पसंख्यांक, सर्वांच्या जीवनात आम्ही परिवर्तन करत आहोत. आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. मात्र, एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. जर कुणी मतांची एवढेच नाही तर, "अरे आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही," असेही फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.



आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू, पण... -


फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशामध्ये जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला.



आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," -


"जर या ठिकाणी ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस (Devendra Fadanvis) यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद