Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीPooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; निकालाकडे सर्वांचे लक्ष!

Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; निकालाकडे सर्वांचे लक्ष!

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षा देण्यासाठी संधी मिळाण्यासाठी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्याचेही दाखवले होते. याशिवाय बोगस अपंग प्रमाणपत्र देखील बनवके होते. त्यामुळे यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करुन तिचे आयएएस पद रद्द केले होते.

याप्रकरणी पूजा खेडकरवर सातत्याने कोर्टात सुनावणी होत असून अटकेपासून तिला संरक्षण मिळत होते. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळते आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -