मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर दोन वर्षांची झाली आहे. राहा आपल्या आई-वडिलांबरोबर जिथे कुठे जाते तेथे मस्ती करताना दिसते. तिचे एक्सप्रेशन प्रत्येकाचे अटेंशन आपल्याकडे खेचून घेतात.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या मुलीचा राहाचा चेहरा चाहत्यांना ख्रिसमसच्या निमित्ताने दाखवला होता. यावेळेस संपूर्ण कुटुंब एकत्र होते.
View this post on Instagram
राहाला पहिल्यांदा पाहून चाहते हैराण झाले होते. आता तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आलियाही सोशल मीडियावर राहाचे फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
फोटोजमध्ये अनेकदा राहा वडील रणबीर कपूरसोबत मस्ती करताना दिसते. कधी ती तिचा हात पकडून चालत असते तर कधी मांडीवर बसलेली असते. राहा जेव्हाही कॅमेऱ्यासमोर असते तेव्हा तिच्या एक्सप्रेशनवरून कोणाचीच नजर हटत नाही. अनेकदा तर ती स्माईल करत असते नाहीतर वेडेवाकडे तोंड करत असते.
View this post on Instagram
रणबीरच्या बर्थडेला आलियाने फोटोज शेअर केले होते. यात तो राहासोबत मस्ती करताना दिसला होता. वडील-मुलाची जोडी एकदम बेस्ट वाटत होती.