Thursday, December 12, 2024
Homeक्रीडाICC Test Ranking : मालिका गमावताच आयसीसीचा भारतीय संघाला दणका!

ICC Test Ranking : मालिका गमावताच आयसीसीचा भारतीय संघाला दणका!

गुणतालिकेत मोठी घसरण; विराट-रोहित टॉप २० मधून बाहेर

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीने गुणतालिका घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. तर रिषभ पंतचा चांगलाच फायदा झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप राहिलेल्या विराटला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. तो ६५५ रेटींग पॉईंट्ससह २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचीही मोठी घसरण झाली आहे. रोहित ६२९ रेटींग पॉईंट्ससह २६ व्या स्थानी आहे.

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही महिन्यांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या बळावर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. केन विलियम्सन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र ८०४ रेटींग पॉईंट्ससह तो अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचाच फलंदाज हॅरी ब्रुक ७७८ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

रिषभ पंतची दमदार कामगिरी

रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. या जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी रिषभने महत्वपूर्ण खेळी करुन संघाचा डाव सावरला. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -