Monday, December 9, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवलीत मराठी रंगभूमी दिन साजरा

डोंबिवलीत मराठी रंगभूमी दिन साजरा

डोंबिवली: मराठी रंगभूमी दिन हा दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली मध्ये ‘सीता स्वयंवर’ नाटक सादर केले होते. हे मराठीमध्ये लिहले गेलेले पहिले नाटक होते. या नाटकानंतर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.याच नाटकाने नाट्यसृष्टीचा पाया रोवला.

आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त ब्राह्मण सभा पाठीमागील डोंबिवली नाट्य कट्टा येथे मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी नंदू गाडगीळ, सुरेश सरदेसाई, विवेक जोशी, भारती ताम्हणकर, सुभाष घैसास, दुर्गाराज जोशी, श्रीकांत कानडे, कुंदन यादव, निरंजन पंड्या उपस्थित होते.

यावेळी दिवंगत कलाकार आनंद म्हसवेकर, मंगेश कुलकर्णी, अतुल परचुरे, विजय कदम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -