Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीSingham Again vs Bhool Bhulaiyaa 3:‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडतोय भारी;तीन...

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3:‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडतोय भारी;तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई

मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर बहुचर्चित ‘सिंघम अगेन’(Singham Again) आणि ‘भुल भुलैया ३’(Bhool Bhulaiyaa 3) चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहेत. एका चित्रपटाची अ‍ॅक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांच मन जिंकुन घेत आहेत.

‘सिंघम अगेन’ २०११मध्ये सुरू झालेल्या सिंघम चित्रपटचा तिसरा भाग आहे. यावेळी ‘सिंघम अगेन’मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन आहे. तसंच महत्त्वाच म्हणजे अजय देवगणसह बॉलीवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अजयसह करिना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरनंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गजेंद्र मोक्ष

मृदगंध…

- Advertisment -