“एक देश एक निवडणूक आणि समान नागरी कायदा लवकरच”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन


अहमदाबाद : भारतात एक देश एक निवडणूक यावर काम सुरू असून लवकरच त्यावर अंमलबजावणी केली जाईल. तसेच सरकार समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज, गुरुवारी गुजरातच्या केवडिया येथे बोलत होते.


पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९व्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय एकदा दिवस समारंभात सहभाग घेतला. केवडिया येथील पटेलांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी येथे आदरांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, यावेळी राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे. एकीकडे आपण एकात्मतेचा उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे दिवाळीचा सण आहे. हा दुहेरी आनंदाचा क्षण असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच 'वन नेशन, वन इलेक्शन'वरकाम करत आहोत. याला लवकरच मंजुरी दिली जाईल आणि ते प्रत्यक्षात आणले जाईल. या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल. तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल.


या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. तसेच भारत आता समान नागरी कायद्याच्या या दिशेने वाटचाल करत आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.


भाजप सरकारने जम्मू-काश्मिरातून कलम ३७० कायमचे हटवले. या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तिथे कोणत्याही भेदभावाशिवाय मतदान झाले. तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली. हे दृश्य भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना खूप आनंद देणारे असेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल आणि हीच आमची राज्यघटना शिल्पकारांना विनम्र श्रद्धांजली असल्याचे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला