राष्ट्रीय एकता दिनी गुजरातमध्ये झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींची मराठीतून प्रतिक्रिया

गुजरात : गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा ऐतिहासिक दुर्ग... मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेल्या या रायगडाची ख्याती अख्या जगभर आहे. रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त होताना म्हंटल आहे. आज ३१ ऑक्टोबर, राष्ट्रीय एकता दिन हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मराठीमध्ये पोस्ट करत म्हटलंय की, रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचं स्थान दिले गेले याचा मला खूप आनंद आहे.







दरम्यान, नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना केवडिया येथे अभिवादन केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारताच्या निर्मितीला विकास आणि विश्वासाची एकता विकसित चालना देते. प्रत्येक योजना, धोरण आणि हेतूमध्ये असलेली एकता ही आपली शक्ती आहे. हे पाहून सरदार वल्लभभाई पटेलांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असेल. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी गेल्या १० वर्षांचा कालावधी अभूतपूर्व कामगिरीने भरलेला राहिला आहे. आज सरकारच्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक कार्यात राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी दिसून येते.


Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी