‘या’ तारखेपर्यंत करु शकणार अपडेट
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शोधा घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे. यासाठी पूर्वी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता ईकेवायसी करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिधापत्रिक धारक आता १ डिसेंबर २०२४पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.