Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीAbhinav Arora : बाल संत अभिनव अरोराला बिश्नोई गँगकडून धमकी!

Abhinav Arora : बाल संत अभिनव अरोराला बिश्नोई गँगकडून धमकी!

मुंबई : बाल संत म्हणून सोशल मीडियावर व्हायरल असणाऱ्या अभिनव अरोराला (Abhinav Arora) बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे सामाजिक अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याभरापासून अभिनव अरोराबाबत अपप्रचार सुरू आहे. त्याला वारंवार फोन करुन अपशब्द उच्चारले जातात. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अभिनवने भक्तीशिवाय इतर काहीच केले नाही. परंतु तरीही बिश्नोई टोळीकडून त्याला मारण्याची धमकी दिली जाते, असा दावा अभिनवच्या घरच्यांनी केला.

अभिनव अरोराची कोर्टात धाव

अभिनव अरोरा यांनी ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबर बाल संत अभिनव अरोरा यांनी सात युट्युबर्सविरुद्ध एफआयआरची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे पालकही उपस्थित होते. अभिनव अरोरा यांनी मथुरेच्या एसीजेएम कोर्टात याचिका दाखल करून सोशल मीडियावर ट्रोल केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे.

अभिनव अरोरा म्हणाले की, प्रभू रामाचा हेतू अमली पदार्थांचे प्रदूषण थांबवण्याचा होता. त्यामुळे प्रभू राम यांना न्यायासाठी पुढे जाण्यास भाग पाडले गेले. असे उदाहरण देत ‘मला कोर्टात जाण्याची इच्छा नव्हती, पण युट्युबर्सनी मला तसे करण्यास भाग पाडले’, असे अभिनव अरोराने म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -