कणकवली : तुम्ही जनतेने एवढ्या मोठ्या संख्येने कुडाळ येथे निलेश राणे, कणकवली येथे नितेश राणे यांचे उमेदवारी अर्ज भरलात. रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आलात.तुमचे हे प्रेम पाहून मी भारावून गेलेलो आहे. सिंधुदुर्गातील जनता, आबालवृद्ध माझ्यावर जे प्रेम करतात. ते पाहून खरेच मी भावूक होतो. माझ्या या आयुष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे मी कितीही काम केले तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. कारण माझ्यामागे तुमचे आशिर्वाद आहेत. तुमचे प्रेम आहे. मला जशी प्रत्येक निवडणुकीत साथ दिली, तशीच या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणून आशिर्वाद द्या आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा, असे आवाहन भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केले.
कणकवली येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आदी उपस्थित होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा नेते नारायण राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांनी काय केले, ते सांगावे. रस्ते ,पुल ,नळयोजना, पाटबंधारे सिंचन प्रकल्प ही सर्व कामे मी केली आहेत. राहिलेला बॅकलॉक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूर्ण केला. कणकवली विधानसभा मतदार मतदारसंघात विरोधकांना कोण उमेदवार भेटला नाही. म्हणून पारकरला उमेदवारी दिली आहे. काही दिवस आमच्यासोबत होता, त्याला महामंडळ दिले. मात्र तो प्रामाणिक राहिला नाही. त्यामुळे नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी त्याचे डिपॉजित जप्त करावे, असा घणाघात खा. नारायण राणे यांनी केला.
तेली, उपरकर यांचा राणेंनी घेतला समाचार
भाजप नेते नारायण राणे यांनी राजन तेली परशुराम उपरकर यांनाचा चांगलाच समाचार घेतला जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. माझ्यावर टीका करतात. अरे तुम्हाला राहायला खायला आणि कपडे घालायला मी शिकवले कसे राहायचे हे तुम्हाला शिकवले ते आता माझ्यावर टीका करतात. हा राजन तेली मुंबई बीकेसीमध्ये ज्या फ्लॅटमध्ये राहतो, त्याला विचारा. चार कोटीचा फ्लॅट मी घेऊन दिला. सतीश सावंतलाही तेथे चार कोटीचा फ्लॅट घेऊन दिला. उपरकर माझ्यासोबत होता, त्यावेळी दुसऱ्याच्या घरात राहत होता. त्याला मी स्वतःचे घर बांधायला लावले. या लोकांनी माझ्यावर टीका करावी आणि ती मी ऐकून घ्यावी, असे होणार नाही. मी टीका टीकेचा हिशोब नियमित चुकता करतो. कारण मी कोणाच्या बसण्या उठण्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी केलेले काम बोलत आहे. तुम्ही एक बालवाडी उभी केली असेल तर दाखवा, अशा शब्दांत खरपूस समाचार उबाठा शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा घेतला.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…