जन सागराच्या साक्षीने कणकवलीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

हजारोंची गर्दी, ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी


कणकवली : कणकवली-देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादी आणि आर पी आय ( आठवले ) महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांनी आज वाजत गाजत मोठ्या उत्साहात विराट जनसागराच्या उपस्थितीत भाजप पक्षाच्या कमळ चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कणकवली तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.


याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे, सौ.नीलमताई राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अॅड.अजित गोगटे, अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सौ. प्रियंका निलेश राणे, सौ. ऋतुजा नितेश राणे, चि. अभिराज निलेश राणे, चि. निमिष नितेश राणे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सेना उपनेते संजय आंग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व, जि.प.माजी अध्यक्ष संजना सावंत,महिला तालुका अध्यक्ष हर्षदा वाळके,राजश्री धुमाळे,राजन चिके, माजी जि. प. उपाध्यक्ष आरीफ बगदादी,देवगड तालुकाध्यक्ष राजू शेटये, अमित साटम, दया पाटील,वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साटे,प्राची तावडे, उषकला केळुसकर, प्रियंका साळसकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, योगेश चांडोसकर,जिल्हा चिटणीस अमोल तेली, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव,अंकुश जाधव यांसह माहायुतीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


उमेदवारी भरण्यासाठी तिन्ही तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने सकाळपासूनच कणकवलीत दाखल झाली होती. श्रीदेव गांगो मंदिर येथून ही रॅली सुरू झाली. मुख्य बाजारपेठ चौक एसटी स्टँड असे करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करून उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.