राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर आक्रमक पवित्रा
संगमनेर : संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे महायुतीची (Mahayuti) सभा झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री व महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी आक्रमक होऊन चांगलाच हल्लाबोल केला आहे.
‘संगमनेर तालुक्यात आम्हाला येऊ देणार नाही, संगमनेर तालुका काय तुमच्या बापाचा आहे का? इतक्या दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटला होता आता गाठ आमच्याशी आहे’, अशी आक्रमक पवित्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा केला आहे.
संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू
पुढे बोलताना ते म्हणाले की या संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू आहे त्या दहशतीचे झाकण आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य जनतेचा रोष तुमच्यावर आहे. यावेळी नक्कीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होणार. त्याचबरोबर तुम्ही महिलांना पुढे करून आंदोलन करत आहे, हे तुम्हाला शोभतं का? आमच्या राहता तालुक्यामध्ये येऊन सुसंस्कृतपणा दाखवायचा आणि लोकशाही आहे असं म्हणायचं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या संगमनेर मध्ये जाळतात.
आमच्याकडे लोकशाही आणि तुमच्याकडे लोकशाही नाही का गाड्या जाळनाऱ्याना आम्ही सोडणार नाही. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्वरित जाहीर निषेध केला. परंतु राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी वृत्ती येथील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे आम्ही आता याला घाबरणार नाही, यावेळी संगमनेर ची जनता परिवर्तन करून दाखवणारच असेही विखे पाटील म्हणाले.