Friday, December 13, 2024
Homeक्राईमपंजाबमध्ये १०५ किलो हेरॉईसह शस्त्रसाठा जप्त!

पंजाबमध्ये १०५ किलो हेरॉईसह शस्त्रसाठा जप्त!

पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने सुरू होती तस्करी

अमृतसर : पंजाब पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने सुरू असलेल्या तस्करीचा भंडाफोड केला. याप्रकरणी लवप्रीत सिंग आणि नवज्योत भुल्लर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ विविध प्रकारचे
अमली पदार्थ आणि ६ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

यासंदर्भात पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये पाकिस्तानमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी जलमार्गाचा वापर केला जात होता. यावेळी पंजाब पोलिसांनी टायरच्या मोठ्या रबर ट्यूब देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नवज्योत सिंग आणि लवप्रीत कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १०५ किलो हेरॉईन, ३१.९३ किलो कॅफिन, १७ किलो डीएमआर हे अंमली पदार्थ, ५ विदेशी पिस्तुले, एक गावठी कट्टा जप्त केलाय.

या घटनेची एफआयआर अमृतसर येथे नोंदवला गेला आहे. या ड्रग तस्करीमध्ये गुंतलेल्या आणखी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागास आणि पुढे संबंध स्थापित करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -