Bhool Bhulaiyaa 3 : आमी जे तोमार ३.० गाणं रिलीज! यंदा मंजुलिकासोबत दिसणार या अभिनेत्रीची जुगलबंदी

मुंबई : भूल भुलैया चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यामधील 'आमी जे तोमार' या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर केले आहे. अजूनही या गाण्याने चाहत्यांच्या मनात रुंजी घातली आहे. आता लवकरच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता 'आमी जे तोमार ३.०' हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मात्र या गाण्यात विद्या बालन या मंजुलिकेसोबत आणखी प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा दिसणार आहे.


भूल भुलैय्या ३ या चित्रपटातील आमी जे तोमार ३.० गाणं लाँच झालं असून गाण्याची एक झलक समोर आली आहे. या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत. यामध्ये विद्या पहिली तर माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवले आहे. त्यामुळे यंदा विद्या आणि माधुरीची भन्नाट जुगलबंदीही पाहायला मिळत आहे. ''बंद दरवाजाच्या पलिकडे नक्की काय रहस्य दडलंय'' असं लिहत हे गाणं लाँच करण्यात आले आहे.


दरम्यान, भुल भुलैया ३ चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय विजय राज, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.


Comments
Add Comment

कांतारा चॅप्टर १ जगभरात धडाकेबाज ठरला! अवतार आणि टायटॅनिकलाही मागे टाकत ऋषभ शेट्टीने रचला इतिहास

दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळवत आहे. त्याच्या

"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे.

कल्कीच्या सिक्वेलमध्ये आलिया दिसणार? चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड ग्लॅम दीपिका पादुकोण आणि बिग बी यांच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने २०२४

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण