भाजपाच्या दुसऱ्या यादीत २२ जणांचा समावेश; जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी

भीमराव तापकीर, देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांचा समावेश


मुंबई : भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २२ जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजापने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे


दुसऱ्या यादीत मुंबईच्या एकाही मतदारसंघाचे नाव नाही. मात्र पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे.


नाशिकमधील देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधून विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सोलापूरमधील राम सातपुते यांचे दुसऱ्या यादीत देखील नाही.


तर महायुतीत वाद असलेल्या आष्टी मतदारसंघाचा देखील या यादीत समावेश नाही. पेणमधून रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विक्रमगडची जागा देखील भाजपच्या वाट्याला आली आहे.



दुसऱ्या यादीतील सर्व २२ उमेदवारांची नावे


मतदारसंघ - उमेदवाराचे नाव


धुळे ग्रामीण - राम भदाणे
मलकापूर - चैनसुख संचेती
अकोट - प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम - विजय अग्रवाल
वाशिम - श्याम खोडे
मेळघाड - केवलराम काळे
गडचिरोली - मिलिंद नरोटे
राजुरा - देवराम भोंगळे
ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
वरोरा - करण संजय देवतळे
नाशिक मध्य - देवयानी फरांदे
विक्रमगड - हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर - कुमार ऐलानी
पेण - रावींद्र पाटील
खडकवासला - भीमराव तपकीर
पुणे छावणी - सुनील कांबळे
कसबा पेठ - हेमंत रासणे
लातूर ग्रामीण - रमेश कराड
सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
पंढरपूर - समाधान औताडे
शिराळा - सत्यजीत देशमुख
जत - गोपीचंद पडळकर

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला