पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात कर्वेनगर भागात रचण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या खून प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी तिघांना काल रात्री ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलीस कडक तपास करत आहेत.
यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी आहेत. तसेच पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला दुजोरा मिळाला. रुपेश राजेंद्र मोहोळ (२२), करण राहुल साळवे (१९) आणि शिवम अरविंद कोहाड (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…