Friday, October 31, 2025
Happy Diwali

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन; तिघांना अटक!

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन; तिघांना अटक!

पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात कर्वेनगर भागात रचण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या खून प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी तिघांना काल रात्री ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलीस कडक तपास करत आहेत.

आरोपींची नावे

यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी आहेत.  तसेच पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला दुजोरा मिळाला. रुपेश राजेंद्र मोहोळ (२२), करण राहुल साळवे (१९) आणि शिवम अरविंद कोहाड (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >