मविआच्या जागावाटपात प्रत्येकाचे ८५ जागांवर समाधान; उर्वरित १८ मतदारसंघ महाविकास आघाडी मित्र पक्षांना सोडणार

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला आहे, याबाबत माहिती दिली.


महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावरुन सातत्याने चर्चा सुरु होत्या. या जागावाटपाच्या बैठकीत काही वेळेला वादही झाले. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तर मोठा वाद झाला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे त्याच निमित्ताने बुधवारीज शरद पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.


महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये ८५-८५-८५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तसेच उर्वरित १८ मतदारसंघ महाविकास आघाडी मित्र पक्षांना सोडणार आहे. अर्थात कुणाला किती जागा देणार याबाबत चर्चा सुरु असल्याचं नाना पटोले आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले. मविआ नेत्यांच्या या माहितीमुळे आता जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका