Wednesday, December 4, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वभारत-कॅनडा तणावातही व्यापारावर परिणाम नाही

भारत-कॅनडा तणावातही व्यापारावर परिणाम नाही

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण असतानाही दोन्हींच्या व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता नाही हे विश्लेषकांचे मत दखल घेण्याजोगे आहे. व्यापार आणि गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही हे विश्लेषकांचे मत निश्चितच विचार करण्यासारखे आणि महत्त्वपूर्ण आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यावर आणि भारतानेही त्यांच्या कृतीला तसेच उत्तर दिल्यानंतर दोन देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. हरदीप निज्जर याची हत्या केल्याप्रकरणी ट्रुडो यांनी भारतावर आरोप केला आणि भारताने त्याला दो टुक असे उत्तर दिले. पण त्याकडे दुर्लक्ष करून भारतावर आरोप चालूच ठेवले आहेत. पण या सर्वांचा परिणाम दोन्ही देशांतील संबंधांवर काहीही होणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी म्हटले की अजूनपर्यंत स्थिती चिंताजनक झालेली नाही.

उमेश कुलकर्णी

भारत-कॅनडा यांच्यातील द्विपक्षी व्यापार इतका मोठा नाही की संपूर्ण व्यापारावर परिणाम होईल. तसे अमेरिकेच्या बाबतीत नाही. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतीत झाले असते, तर निश्चितच भारताच्या समग्र व्यापारावर परिणाम झाला असता. कॅनडा पेन्शन फंड भारतात गुंतवणूक करणे सुरू ठेवेल. सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात अशा देशांच्या माध्यमातून त्याला आपली गुंतवणूक ठेवावी लागली तरीही कॅनडा तेवढे करेल. त्यामुळे भारतात या मुद्यावर चिंता नाही. भारताच्या एकूण व्यापारात १ टक्क्याहून कमी सहभाग असलेला कॅनडा भारताचा ३३ वा सर्वात मोठा व्यापारी हिस्सेदार आहे. चालू वित्तीय वर्षाच्य़ा अगोदर सात महिन्यांच्या दरम्यान भारताचा एकूण व्यापार कॅनडाशी २.६८ अब्ज डॉलर इतका होता. अर्थात ताज्य विवादामुळे कॅनडातून आयात केली जाणारी मटार आणि मसूर डाळीच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. भारतात दोन प्रमुख डाळींच्या वापरातील या प्रमुख डाळी आहेत. त्यामुळे एकीवर निश्चितच वाईट परिणाम होऊ शकतो. भारत गेल्या काही वर्षांपासून कॅनडाशिवाय इतर काही ठिकाणाहून डाळींची आयात करण्याचा पर्याय शोधत आहे. कॅनडाबरोबर राजनैतिक संघर्ष हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. वित्तीय वर्ष २०२४ मध्ये भारताने विक्रमी १६.७ लाख टन मसूरची आयात केली होती. ज्यात कॅनडाने जवळपास ४६ टक्के, तर ऑस्ट्रेलियाने ४९ टक्के योगदान दिले होते. याच प्रकारे भारताने वित्त वर्ष २०२४ मध्ये पिवळी मटारची आयात ११.६ लाख केली होती आणि ज्यात कॅनडाचा वाटा होता ५२ टक्के, तर रशियाचा वाटा होता जवळपास
३० टक्के.

विशेषज्ञांचे म्हणणे असे आहे की भारत आणि कॅनडा यांच्यात आता व्यापारिक करार करण्याची शक्यता थंड्या बस्त्यात राहील आणि त्याला कारण फक्त ट्रुडो यांचे सरकार आहे. ट्रुडो यांचे सरकार आहे तोपर्यंत भारत कॅनडा यांच्यातील व्यापारी संबंध सुरळीत होणार नाहीत. मात्र सध्या त्यांना धोकाही नाही हे ही विशेषज्ञ आवर्जून सांगतात. कॅनडा भारताचा मोठा व्यापारी भागीदार नाही. आणि या दोन देशांतील व्यापार अगदी थोडा आहे. त्यामुळे संबंध बिघडले तरीही भारतावर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र सध्य़ा दोन्ही देशांतील जो तणाव आहे त्याचा परिणाम मुक्त व्यापारी करारासंदर्भातील बोलण्यावर होऊ शकेल. एफटीए बोलणी पुन्हा सुरू करण्यावर जी चर्चा होईल त्यात अडथळे आणले जातील. ट्रुडो सरकार हे तोपर्यंत एटीए बोलणी पुढे ढकलली जातील यात काही शंका नाही. वित्त वर्ष २०२४ मध्ये भारतात कॅनडातून केली जाणारी निर्यात जवळपास ३.८४ अब्ज डॉलर इतकी होती. जी निर्यात २०२३ मध्ये ४.११ अब्ज डॉलर इतकी होती. भारतातून कॅनडात निर्यात केल्या जाणाऱ्या प्रमुख वस्तुंत औषधे, वस्त्रप्रावरणे, हिरे, रसायने तसेच आभूषणे, सागरी खाद्य पदार्थ यांचा समावेश होतो. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू, इंजिनिअरिंगचे अपरेटस यांचा समावेश आहे. वित्त वर्ष कॅनडातून केली जाणारी आयात जवळपास ४.५५ अब्ज डॉलरची होती, जी एक वर्ष अगोदर ४ अब्ज डॉलर इतकी होती. दिल्लीतील एक थिंक टँकचे म्हणणे असे आहे की दोन्ही देशांत जो राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे त्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यात व्यापारी संबंध बिघडले आहेत. पण त्यांच्यातील व्यापारावर त्याचा प्रभाव कमीत कमी आहे. कारण त्यांचा व्यापार इतका मोठा नाही. याचे एक कारण असेही सांगितले जाते की व्यापार हा खासगी स्तरावर केला जातो आणि भारत अथवा कॅनडा यांच्यात असे कोणतेही नियमन लागू नाही की ज्यामुळे वस्तूंच्या आदान प्रदानावर कोणतेही प्रतिबंध लागू होतील.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर भारत कॅनडा यांच्यात भलेही राजनैतिक संघर्ष दिसत असेल पण त्यांच्यातील व्यापारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तो तसाच जोरदार सुरू आहे. दोन्ही देशांतील व्यापारावर राजनैतिक संघर्षाचा कोणताही परिणाम दिसत नाही. हे मान्य आहे की हरदीप निज्जर याच्या हत्येनंतर आणि ट्रुडो यांच्या भारतविरोधी वक्तव्यानंतर भारत कॅनडा यांच्यातील संबंध अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निष्कासित केले आहे आणि ही बाब दोन्ही देशांतील संबंधांवर दूरगामी परिणाम करणारी आहे. पण दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर याचा निश्चितच गंभीर परिणाम झालेला नाही आणि ही बाब दोन्ही देशांसाठी चांगली आहे. सध्या दोन्ही देशांत फारसे व्यापारी संबंध नाहीत. पण अलीकडच्या काही घटनांमुळे दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर निश्चितच वाईट परिणाम झाला आहे. मात्र भारत आणि कॅनडा यांच्यातील वस्त्रप्रावरणांच्या व्यापारावर फारसा गंभीर परिणाम झालेला नाही. दरम्यान भारत कॅनडा यांच्यातील व्यापारी संबंधाच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी ही ट्रुडो यांची असेल असे भारताने ठणकावून सांगितले आहे. कारण आगळीक ट्रुडो यांच्याकडून करण्यात आली आहे. भारतीय एजंट्सना हरदीप निज्जर याच्या हत्या प्रकरणाशी जोडणाऱ्या ट्रुडो यांची ही सर्वस्वी जबाबदारी असेल असे भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मुळात जेव्हा मागील वर्षी भारताने कॅनडातील अतिरेकी हरदीप निज्जर याच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आले तेव्हा भारताकडे त्याचा यात सहभाग असल्याबद्दल कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि ते आरोप केवळ ट्रुडो यांची मनगढंत कहाणी होती हेही आता भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. विषय आहे तो व्यापारी संबंधांचा. भारत कॅनडा यांच्यातील व्यापारी संबध आहेत तसेच आहेत आणि त्यात फार मोठी वाढ झाली नसली तरीही फार मोठी घटही झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतीय एजंट्सना गुन्हेगारी कृत्यांशी जोडणाऱ्या कॅनडाच्या कृत्याविरोधात भारताने जोरदार मोहीम उघडली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांत व्यापारी संबंध पूर्वीसारखेच आहेत. निज्जर कुणी संत महात्मा नव्हता आणि त्याला ठार मारले असेल, तर ते चांगलेच केले आहे ही भूमिका असली पाहिजे. तो खलिस्तान चळवळीतील एक समर्थक होता आणि त्याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापारावर परिणाम व्हावा असे योग्य नाही. हीच बाब भारताने प्रकर्षाने समोर आणली आहे.

ट्रुडो यांनी मान्य केले आहे की त्यांच्याकडे हरदीप निज्जर याच्या हत्येसंदर्भात कोणतेही ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे त्यांनी केलेल्या या असत्य विधानाच्या आधारे दोन्ही देशांतील व्यापारावर परिणाम व्हावा असे काहीही सिद्ध झालेले नाही. मात्र एक आहे आणि ते म्हणजे सध्या दोन देशांत व्यापारी संबंध नीचतम पातळीवर आहेत. त्यात या नव्या राजनायिक संघर्षाने भर पडू शकते.
हे संबंध पुन्हा सुधारण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -