मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत उबर युजर्सना प्रत्येक पात्र राईडवर फ्लिपकार्टचे सुपरकॉइन्स मिळणार असून, हे रिवॉर्ड्स आता दैनंदिन प्रवासाशी थेट जोडले जाणार आहेत.
गुंतवणूकदारांना २.१० लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजाराने आज आपली लवचिकता दाखवली. व्यवहारांची सुरुवात लक्षणीय घसरणीने ...
भागीदारीअंतर्गत मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन उबर युजर्स किंवा गेल्या 84 दिवसांपासून सक्रिय नसलेल्या युजर्सना, अकाउंट लिंक केल्यानंतर 28 दिवसांच्या आत पहिली राईड पूर्ण केल्यास 150 बोनस सुपरकॉइन्स मिळतील. तसेच 15 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान अकाउंट लिंक करून 28 दिवसांत पहिली राईड पूर्ण करणाऱ्या युजर्सना अतिरिक्त 50 बोनस सुपरकॉइन्स दिले जातील. फ्लिपकार्टचे व्हाईस प्रेसिडेंट (पेमेंट्स आणि सुपरकॉइन्स) गौरव अरोरा यांनी सांगितले की, सुपरकॉइन्सना केवळ शॉपिंगपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. उबरसोबतची ही भागीदारी ग्राहकांना अधिक व्यापक फायदे देईल, असे त्यांनी नमूद केले.
उबरचे इंडिया आणि दक्षिण आशियाचे बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर अर्णब कुमार यांनी सांगितले की, ग्राहकांचा रोजचा प्रवास अधिक सुलभ आणि फायदेशीर बनवणे हे उबरचे ध्येय आहे. या भागीदारीमुळे रायडर्सना सोप्या पद्धतीने अतिरिक्त लाभ मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही भागीदारी दोन मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना एकत्र आणत असून, दैनंदिन सेवांमध्ये रिवॉर्ड्सचा वापर वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






