सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी, २७ कोटी ७८ लाखांची मालमत्ता जप्त

  109

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण


मुंबई: राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.


राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी

एसटी महामंडळ यात्री अ‍ॅप चालवणार

मुंबई (प्रतिनिधी) : चालकाला सन्मानजनक मोबदला व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन