Nitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची 'डी' गँग झाली आहे!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात


मुंबई : केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दररोज कोणतेही विधान मांडतो. आज संजय राऊतने 'भाजपा पक्ष हा बिश्नोई गँग आहे', या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला चांगलेच फटकारले आहे. हिंदूचा द्वेश करणं, त्यांना टार्गेट करणं, पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणं या सर्व दाऊद गँगचे गुण उबाठाने घेतलेले आहेत. म्हणून शिवसेना उबाठा ही 'डी' कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही गँगची उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झालेली आहे त्यावर लक्ष द्यावे. नंतर भाजपाला नावं ठेवत बसावे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतचा मालक म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.


काल पुन्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच्या ईश्वरपूरमध्ये राहून कानाखाली मारली. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यासाठी कपडे देखील शिवत आहे. तर दुसऱ्याबाजूने शरद पवार, नाना पटोले हे यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणून उद्धव ठाकरेची लायकी काय आहे, हे आम्ही सांगण्यापेक्षा मविआचे मित्रमंडळ पक्ष दाखवत आहे, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद