Hema Malini : ...म्हणून हेमामालिनीने सोडले मुंबईतले 'ते' घर!

शेअर केला अंगावर काटा आणणारा अनुभव


मुंबई : बॉलिवूडची ड्रीमगर्ल अशी ओळख असणाऱ्या हेमामालिनी (Hema Malini) वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांच्या नृत्यांगनामुळे लाखो चाहत्यांच्या मनात वेगळंच घर निर्माण केलं आहे. हेमा मालिनी मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी त्या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच सध्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्यासोपबत घडलेला धक्कादायक अनुभव (Hema MaliniScary experience) शेअर केला.


अभिनेत्री हेमामालिनी आपल्या कुटुंबासह नव्याने मुंबईत राहायला आल्या असताना त्यादरम्यान अभिनेत्रीसोबत खूप विचित्र घटना घडल्या होत्या. 'सपनों का सौदागर' या सिनेमाचं शूटिंग करत असताना हेमामालिनी कुटूंबाबरोबर वांद्रे येथील मानवेंद्र अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. मात्र त्या बंगल्यात हेमामालिनी यांच्यासोबत दररोज रात्री झोपेत भयानक गोष्टी घडू लागल्या.


त्यांनी या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्या रात्री झोपायच्या तेव्हा त्यांना झोपेत त्यांचा कुणीतरी गळा दाबत असल्याची जाणीव होत होती. त्यामुळे त्यांना दचकून जाग यायची आणि रात्री त्यांना नीट झोप लागायची नाही. सततच्या होणाऱ्या या घटनांमुळे हेमामालिनी यांनी वांद्रे येथील राहते घर सोडून जुहूमधील सातव्या रोडवरील एका बंगल्यात शिफ्ट झाले. दरम्यान, या सर्व गोष्टी आठवल्या की अजूनही अंगावर काटा येतो, असेही हेमामालिनी यांनी म्हटले.

Comments
Add Comment

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात