Nitesh Rane : आधी पुरावे द्या नंतर स्वत:चे थोबाड उघडा!

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : 'महायुतीच्या उमेदवारांसाठी १०-१५ कोटींचा पहिला हफ्ता आला' असे वक्तव्य केलं की लगेच ब्रेकिंग न्यूज मिळते. सकाळी उठून आरोप करायचे, खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हाच संजय राजाराम राऊतचा (Sanjay Raut) धंदा आहे. सर्व न्यूज चॅनेल त्याच्या बातम्या चालवतात आणि काही दिवसानंतर अब्रु नुकसानीच्या आरोपाखाली कोर्टाकडून नोटीस मिळतात तेव्हा हाच संजय राजाराम राऊत तोंड काळं झाल्यानंतर हात जोडून 'मला अटक करु नका' असे म्हणत गिडगिडायला लागतो. त्यामुळे आता १० ते १५ कोटी प्रत्येक उमेदवाराच्या मतदार संघामध्ये आल्याचा एक जरी पुरावा संजय राजाराम राऊतने दिला तर उद्यापासून मी सामना मध्ये त्याच्यासोबत काम करायला जाईल, असे खुले आव्हान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला दिले.



कर्जतमधील ठाकरेंच्या फार्महाऊसवर काळा पैशाचा घपला


त्याचबरोबर कर्जतमधील ठाकरेंच्या फार्महाऊसवर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उतरवले गेल्याची माहिती मिळाली आहे, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालावं. तसेच कर्जत फार्महाऊसवर जमा असणारा काळा पैशाबाबत काही घपला झाल्यामुळेच संजय राजाराम राऊतच्या मालकाला छातीचा त्रास झाला नाही ना, आणि त्याच्यामुळेच एनजीओ प्लास्टी झाली नाही ना? या प्रश्नाची उत्तरे द्यावी. त्यानंतर संजय राजाराम राऊतने स्वत:चं थोबाड उघडावं, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.



पंतप्रधानांसारख्या माणसाबद्दल गावगुंडाने बोलूच नये


'निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी सध्या मोकळे आहेत, परदेशात फिरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका आता एका टप्प्यात होण्यास हरकत नाही', संजय राऊतने केलेल्या या वक्त्व्यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मोदी साहेबांनी काय करावं आणि काय करु नये, ते सांगण्याची पात्रता याच्या सारख्या माणसाची नाही. जो स्वत: बेलवर बाहेर आहे, खिचडीपासून कोविडच्या औषधापर्यंतचे सर्व आरोप संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर आहे. त्यामुळे संजय राऊतसारख्या गावगुंडाने पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा मोठ्या माणसाबाबत बोलण्याची हिंमतही करु नये. तसेच 'चड्डीत राहायचं' अशा मराठी चित्रपटातील डायलॉगसारखं संजय राजाराम राऊतनेही चड्डीत राहायचं आणि औकातमध्ये बोलावं, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी